Author Topic: शिर्डीत वाघ गर्जला  (Read 531 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
शिर्डीत वाघ गर्जला
« on: July 02, 2015, 09:40:43 PM »
गल्लोगल्ली बरसला
मनुवादावर भडकला
दिशा दाही डरकला
शिर्डीत वाघ गर्जला  !!


मर्दानी रक्त दिसले
बोल एकीचे उठले
जोतो बघण्या तरसला
शिर्डीत वाघ गर्जला !!

सागरच्या हत्येचा निषेध
केला मनुवादाला छेद
भीमाचा छावा झळकला
शिर्डीत वाघ गर्जला !!


आमचं आंबेडकरी रक्त
राही जातीसाठी सक्त
दुश्मनही बघून परतला
शिर्डीत वाघ गर्जला !!


जय भीम जय भीम
संजय बनसोडे- 9819444028
(सदर कवीता कवीच्या नावासोबत पुढे पाठवा )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
Re: शिर्डीत वाघ गर्जला
« Reply #1 on: July 03, 2015, 08:21:07 AM »
awsome poem sir .