Author Topic: मानवतेचे करा कर्म  (Read 793 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मानवतेचे करा कर्म
« on: July 04, 2015, 04:04:41 PM »
नका करू धर्म धर्म
मानवतेचे करा कर्म
धर्माच्या आहारी जाऊन
नका करू अधर्म !!


व्हा मानवतेचे पुजारी
माणुसकीच जगा तारी
समान माना पुरुष नारी
 नका बनू अहंकारी !
दया शांती हेचि मर्म
मानवतेचे करा कर्म !!


सर्वांशी  प्रेमाने  वागा
विज्ञानाचा धरा धागा
माणुसकी शिकवा जगा
एकीची कास करा वेगा !
शांतीचा स्वीकारा स्वधर्म
मानवतेचे करा कर्म !!


धर्म एकच साऱ्याचा
वेग धरा वाऱ्याचा
स्वप्न छून्या ताऱ्याचा
विश्व जिंकणेच माझा धर्म
मानवतेचे करा कर्म !!


संजय बनसोडे
9819444028
(सदर कवीता कवीच्या नावासोबत पुढे पाठवा )


Marathi Kavita : मराठी कविता