Author Topic: तुजवाचून काही न अडते  (Read 997 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
तुजवाचून काही न अडते
« on: July 08, 2015, 09:58:37 PM »
माझ्यामुळेच चाले सारे
माणसाला नित वाटे
तुजवाचून काही न अडते
एकदा जाऊन तु बघ ते

मी करी म्हणूनच होई
भ्रम मनी तो बसतो
तुझ्यापेक्षा होईल चांगले
तूच एक अडचण ठरतो

कुणावाचुनी नाही थांबले
जग अखंडित हे चाले
कितीक भले आले जगती
अन कितीक निघून गेले

तुझ्या कडून जे होईल
चांगले करी मानवा
या सृष्टिवर माणूस
दोन दिसाचा पाहुणा
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता