Author Topic: हे भीमाच आहे घर गं  (Read 698 times)

Offline sanjay bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 251
हे भीमाच आहे घर गं
« on: July 17, 2015, 09:52:28 AM »
लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूला तिचा नवरा (कट्टर भीम सैनीक ) बोलत आहे.


पंचशीला म्हण गं, जय भीम कर गं
नको होऊ अशी बेदर्द
हा देव्हारा - बाजूला सार गं
हे भीमाच आहे घर गं !!

नको उपास तापास करू
नको स्त्री बंधनात मरु
आठव जोतिबा सावित्रीला
कास त्यांची तू आता धर गं हा देव्हारा बाजूला सार गं
हे भीमाच आहे घर गं !!


नको दगडाला अशी तू पूजु
नको अंधश्रद्धेत  तू रुजू
आठव भीमाच्या बावीस प्रतिज्ञा
बुद्ध वंदना सुरू कर गं
हा देव्हारा बाजूला सार गं
हे भीमाच आहे घर गं !!


माझ्या बापानं मंत्र गं दिला
सोड आता त्या दगड धोंड्याला
बुद्धाची शिकवण जगाला दावू
बुद्ध विहारात आता तरी चल गं
हा देव्हारा बाजूला सार गं
हे भीमाच आहे घर गं !!


चल एकीने संघर्ष करू
पुरोगामी विचार मनी धरू
चुल आणी मुलं सोच त्या पलीकडं
कायदा भीमाचा हाती तू धर गं
हा देव्हारा बाजूला सार गं
हे भीमाच आहे घर गं !!


संजय बनसोडे - 9819444028





Marathi Kavita : मराठी कविता

हे भीमाच आहे घर गं
« on: July 17, 2015, 09:52:28 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):