Author Topic: शेतकरी आणी सरकार  (Read 1487 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
शेतकरी आणी सरकार
« on: July 17, 2015, 10:14:45 AM »
ढासळत चालला शेतकऱ्यांचा धुरा
सरकार म्हणते फक्त योग करा !!

आवळत चाललाय शेतकऱ्यांच्या फास गळ्यात
हल्ली सरकारचे लक्ष नाशिकच्या कुंभमेळ्यात !!

पैशासाठी शेतकरी विकतो घरावरचे पत्र
सरकार म्हणते शिका संस्कृत व्हा पवित्र !!

शेतकरी म्हणतो कर्ज माफ करा
सरकार म्हणते गो हत्या बंद करा !!

दरवर्षांच्या दुष्काळाने शेतकरी झालाय साफ
सरकार म्हणते योगानी होईल तुमचा लाभ !!

काय होईल शेतकऱ्यांचे नाही कुणा आइडिया
सरकार मात्र बोलते मेक इन इंडिया !!


कवी - संजय बनसोडे
9819444028


Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: शेतकरी आणी सरकार
« Reply #1 on: July 17, 2015, 03:16:59 PM »
फारच छान...... :) :) :)

suraj choudhari

  • Guest
Re: शेतकरी आणी सरकार
« Reply #2 on: November 14, 2015, 05:28:53 PM »
zabardastta........!