पिंजरा तोडून
मुक्त झालेला तो पक्षी
जखमी पंखातील रक्ताने
हिरव्या भूमीवर
लाल नागमोड उमटवीत
उडतो आहे आपल्या घरट्याकडे,
कदाचित आपल्या म्रुत्युकडेही.
पण
त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही
हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला
त्याचा आनंद ... अभिमान...
पिंजरा तोडल्याचा.
- कुसुमाग्रज