Author Topic: हवी आहे साथ  (Read 1509 times)

Offline Vedanti

  • Newbie
  • *
  • Posts: 34
  • Gender: Female
हवी आहे साथ
« on: August 01, 2015, 02:29:50 PM »
सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकाची ,
त्यासाठी पुस्तकाला हवी साथ  ज्ञानाची…

निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
त्यासाठी संतांना हवी साथ संस्कारांची…

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची …
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची …

सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय  जीवनाची।।१।।

तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
त्यासाठी सूर्याला हवी साथ  प्रकाशाची…

सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
त्यासाठी फुलाला हवी साथ सुगंधाची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची…
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची…

सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।

उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
त्यासाठी कलाकाराला हवी  साथ कलेची …

शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
त्यासाठी हृदयाला हवी साथ शांत चित्ताची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची  …
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची  …

स्मित हास्य आणि शांत मन यांच्या संगतीनेच ,
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय  जीवनाची।।३।।


वेदांती
« Last Edit: August 01, 2015, 08:38:09 PM by Vedanti »

Marathi Kavita : मराठी कविता

हवी आहे साथ
« on: August 01, 2015, 02:29:50 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक दोन किती ? (answer in English number):