Author Topic: शेअरबाझार  (Read 431 times)

Offline smadye

  • Newbie
  • *
  • Posts: 42
शेअरबाझार
« on: September 04, 2015, 05:54:14 PM »
   शेअरबाझार

असा एक व्यापार त्याला नाव शेअरबाझार
चढाओढ असते तिथे किमतीची फार

नफ्यातोट्याचा असतो दिवसाचा व्यवहार
कंपनीच्या किमतींची होते चढउतार

आज पडला मुल्यांक, तर आपले सरकार बेकार
उद्या वर चढला तर म्हणतो जग चालले उंच फार

काल घेतला असता तर आज झाला असता फायदा
उगाच थांबलो आधी विकला असता तर भाव होता ज्यादा

वेळेची किंमत कळेल का कधी कोणाला
ती एकदा कळली कि अर्थ येईल जीवनाला

जर तर मध्ये आपण गुंततच बसतो
शेअरबाझार म्हणा कि जीवन वेळेवर निर्णय घ्यायला आपण मागेच राहतो

                       सौ सुप्रिया समीर मडये

Marathi Kavita : मराठी कविता