विद्यालय हे मंदिर विद्येचे
विद्यालय हे मंदिर विद्येचे
शारदा तिची देवता
या मुलांनो चला येथे शिकूया
दया, क्षमा, मानवता
आपण येथे अक्षर शिकू
शिकू लिहण्या वाचण्या
खेळ कवायत मधुनी शरीर कमवू
देश बळकट बनविण्या
पाटी पुस्तक हाती घेवूनी
करू येथे ज्ञान साधना
चित्रकला अन संगीत ही शिकू
शिकू या विविध कला
सत्याची येथे शिकवण घेवू
दृष्ट्य प्रवृत्तीवर चढवू हल्ला
शिकून सारे मोठे व्हा हसता खेळता