Author Topic: कशाला जाता पंढरी अन् काशी  (Read 769 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
कशाला जाता पंढरी अन काशी

कशाला जाता पंढरी अन् काशी
सर्व दैवत आईच्या चरणापाशी

तीर्थस्नांनासाठी हिंडता ठायी ठायी
त्या नद्यांचा उगम आईच्या चरणापायी
पुण्य कामाविण्या देवळात जाई
त्या पुण्याची गठडी असे आईपाशी
      कशाला जाता पंढरी अन् काशी

आई सेवेची पुण्याई सर्व जागा असे मान्य
आई सेवेहून जगामध्ये असे कोणते मोठे पुण्य
आईच्या सेवेने होशील रे धन्य
मग कशाला पाळता एकादशी ्राहता उपाशी
      कशाला जाता पंढरी अन काशी

ज्या ईश्वराने शोधतो दिशातून दाही
तोच ईश्वर आईच्या हृदयात राही
त्यासी मानव दगडात पाही
मानव अशी मूर्ख झाले कशी
      कशाला जाता पंढरी अन काशी