Author Topic: पुन्हा जिंकण्यासाठी  (Read 2101 times)

Offline abhishek panchal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
पुन्हा जिंकण्यासाठी
« on: September 07, 2015, 01:50:12 PM »
रातीचं काय , ती नेहमीच अशी येते
थकलेल्या या जीवाला ,  तिच्या कुशीत घेते
नीजावुन मग मला , ही स्वप्न दाखवते
अर्धी ठेऊन स्वप्न , भल्या पहाटे जागवते
हिच अर्धी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
आणि आयुष्यात पुन्हा जिंकण्यासाठी

                               - अभिषेक पांचाळ

Marathi Kavita : मराठी कविता


Devidas borde

  • Guest
Re: पुन्हा जिंकण्यासाठी
« Reply #1 on: September 08, 2015, 07:47:19 PM »
तुझ प्रेम...
तुझ प्रेम माझ्यासाठी
परमेश्वराच वरदान आहे
माझ्या जीवनात तुझ स्थान
त्याच्या एवढंच महान आहे
तुझ्या प्रेमात आहे नक्कीच काही खास
तुझ माझ प्रेम म्हणजे
दोन शरीर एक श्वास....

गोटू पाटिल बोर्डे
 भोकरदन

Devidas borde

  • Guest
Re: पुन्हा जिंकण्यासाठी
« Reply #2 on: September 08, 2015, 07:55:27 PM »
माझ्या मते...
मुळातच प्रेम नसले तर
तुटल्याच दुःख होत नाही,
जुळलेल प्रेम तुटले तर
विरहाच्या दुःखाला अंत राहत नाही
प्रेम तुटले तर
हृदयात आठवणी शिवाय
काही राहत नाही..
असे झालेच तर
माझे आयुष्य पुढे रेटनारच नाही..

                गोटू पाटिल बोर्डे
                  भोकरदन

Atharva

  • Guest
Re: पुन्हा जिंकण्यासाठी
« Reply #3 on: September 12, 2015, 05:35:15 PM »
 ;D ;D ;D