Author Topic: मानवी मेंढया  (Read 557 times)

Offline Kishor Dange

  • Newbie
  • *
  • Posts: 10
मानवी मेंढया
« on: September 22, 2015, 06:05:13 PM »
मुंढया खाली घालून जाताना िदसला एक मेंढयाचा मोठा कळप...
शरीर मेंढयाचे पण चेहरे माञ माणसाची भासत होती ,
तयात ओळखीचे ही चेहरे िदसत होती ,
मात्र एक तसेच मेंढरु एकटेच चालले होते कळपा विरुध्द धुंदीत ..
आणि चक्क कळपातून हालचाल झाली , त्या मेंढयाकडे पाहून लागले हसायला नि कुजबुजायला ,
वेडाच आहे गुमान पणे चालायचे कळपाचया वाटेने, तर उगाच चालला त्या काटेरी वाटेने ..
काही काळजी चे सवरही उमटत होती कळपातून मोठ्या हिमतिने मात्र दबकया आवाजात ...
नव्हती पवॊ कोकराला त्या या सर्वाची ,
तो चालतच होता काटेरी वाटेने , नि गळून पडत होती शरीरावरील लोकर आणि सपषट दिसायला  लागला होता त्या मागील माणूस ...
आता कळपातील सर्व लागले गुणगाण गायला तयाचे, अन् लागले पुजा करायला त्याची देवतव बहाल करून ...
उभारले पुतळे तयाचे निघाले जथे जयघोषाचे...
आणि पुन्हा जमा वहायला लागले पुतळयासमोर कळपाने खाली मुंढया घालुन ......!

किशोर डांगे
पाथडीं , जिल्हा -अहमदनगर
8805503586

Marathi Kavita : मराठी कविता