Author Topic: आनंद  (Read 1195 times)

Offline smadye

  • Newbie
  • *
  • Posts: 42
आनंद
« on: September 26, 2015, 06:09:23 PM »
आनंद

आनंदी आनंद गडे
जिकडे निकडे चोहीकडे
असे असता आपण दु:खी का बरे
सुखासाठी धावपळ सतत का रे

सुखाचा अर्थ कधी गवसणार
मिळाले त्यात सुखी कधी रहाणार
आयुष्य सुख मिळविण्यामागे मग
सतत धावत फुकट जाणार

चढाओढीची हि शर्यत
चालणार आयुष्याच्या शेवटपर्यंत
मग एका संध्याकाळी विचार करणार
आयुष्याच्या मिळवणीचा करीत गुणाकार भागाकार

आनंद आहे आपुल्या मनी
आनंद आहे अपुल्या जीवनी
तो कधी मी उपभोगणार
का करणार फक्त जमाखर्चाचा व्यवहार

सुखी रहा रे सुखी राहा
अंतरीच्या समाधानाला ओळखा
आयुष्य मिळते फक्त एकदा
ते आनंदाने जगायला शिका

सुखामागे दु:ख, दु:खामागे सुख
चक्र हे असेच फिरत रहाणार
दु:खाने न हिरमुसता शिकत राहा अनुभवाने
मग सुख जमेल अनुभवणे आनंदाने

               सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com
« Last Edit: September 26, 2015, 06:10:42 PM by smadye »

Marathi Kavita : मराठी कविता