Author Topic: एकीने संघर्ष करा  (Read 855 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
एकीने संघर्ष करा
« on: September 29, 2015, 08:35:52 PM »
ज्ञानीवंत तो ज्ञानी खरा
शिकवण त्याची ध्यानी धरा
ऐका भीमाच्या नारी नरा
पुन्हां एकीने संघर्ष करा !!धृ !!

 नसता सूट हा नसता बूट
नसता रामजीचा तो सपूतं
नको पडू रे भ्रांतीत ये भीमाच्या क्रांतीत
नको हलवू दुसरीकडे शेपूट
भीमाच्या शूरा ये बुद्धाच्या घरा !!1!!

आठव काळाराम मंदिराचे रण
ती चवदार तळ्याची आठवण
होतं जनावराच तुला रे जिनं
तेंव्हा आला रे भीम धावून
नसता तुला रे थारा नसता भीमसंघर्ष वारा !!2!!

भीमक्रांती साऱ्याला सांगू
एकीने सारे येथे नांदु
बुद्ध धम्मालाच येथे वंदु
सांगे संजय तुझा हा बंधु
हो वादळी वारा हो आकाशी तारा !!3!!

संजय बनसोडे 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता