Author Topic: मी नाही मागितले  (Read 965 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
मी नाही मागितले
« on: October 02, 2015, 09:40:39 AM »
मी नाही मागितले
सूर्याला त्याचे सत्व
मागितले मी त्याला
जगाला प्रकाश देण्याचे त्याचे तत्व

 मी नाही मागितले
चंद्राला त्याचे सौंदर्य

इतरांना शितलता देण्याचे त्याचे औंदार्य

 मी नाही मागितली
वा-याला त्याची गती

सर्वांना प्राणवायू देण्याची त्याची मती

 मी नाही मागितले
पर्वतास त्याची विशालता
मागितले प्रतिकूल परिस्थितीतही
अटल राहण्याची त्याची निर्भयता

 मी नाही मागितले
सरितेस तिची शीतलता
मागितले सर्वांची तहान भागविण्याची
तिची महानता

 मी नाही मागितले
मानवास त्याची हुशारी
मागितले त्याचे हृदय
ज्यामुळे तो शत्रूला ही आपलासा करी

Marathi Kavita : मराठी कविता