Author Topic: तुझ्या प्रेमा मध्ये  (Read 1115 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
तुझ्या प्रेमा मध्ये
« on: October 03, 2015, 08:07:40 AM »
मी तुझ्या प्रेमामध्ये फकिर झालो ठार
प्रेमाच्या नशेमध्ये बुडून गेलो फार

भूक गेली तहान विसरलो
विसरलो शरीराचे भान
जगा विसरून  करीत  बसलो
तुझ्या नावाचे ध्यान
विसरून बसलो मी सार - सार

मजनूच्या पुढे झाली
माझी दैन
सर्व सोसिले सर्व साहिले कष्ट
तुझ्या प्रेमासाठीच ना
तरी तुजला का करुणा माझी येईना
माझ्या प्रेमाला तू का  देत नाही आधार

कपड्याचे न भान राहिले
पुरता जाहलो भिकारी
प्रेमाच्या भिक्षासाठी
सदा येतो तुझिया दारी
देऊन प्रेमाची भिक्षा करी कृपा माझ्यावरी
तुझ्या करीता घेतला मी पागलाचा अवतार

तुझ्यासाठी सोडून दिले मी
या सा-या जगाला
माझे सर्वस्व अर्पिली
प्राणही दिले तुला
थोडे तरी समजून घे तू मला
कधी उघडशील तुझ्या हृदयाचे द्वार

Marathi Kavita : मराठी कविता


vikram chaure

  • Guest
Re: तुझ्या प्रेमा मध्ये
« Reply #1 on: October 12, 2015, 11:55:47 PM »
I live in solapur and studied at gp solapur and it is relited to my life