Author Topic: बाप माझा विठ्ठल माय रखूमाई  (Read 703 times)

Offline Vikas Vilas Deo

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
बाप माझा विठ्ठल
माय राखूमाई
वंदितो सदा त्यांना
अन्य देव नाही

पाऊस धो –धो कोसळतांना
बाप डोईवर छत झाला
माय गारठली थंडीत
आम्हा ऊब त्यांनी दिला

भूक पोटस लागता
माय उपाशी झोपली
आमच्या नवीन कपडापायी
बापान फाटकी कापड घातली

ठेच लागता पायाला
माईला वेदना झाल्या
बरे नसतांना आम्हा
बापाने रात्र जागून काढल्या
 

Marathi Kavita : मराठी कविता


vikram chaure

  • Guest
Re: बाप माझा विठ्ठल माय रखूमाई
« Reply #1 on: October 12, 2015, 11:51:59 PM »
Best  i like it