Author Topic: या मानवांनो या रे या  (Read 496 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
या मानवांनो या रे या
« on: October 10, 2015, 04:45:13 PM »
या मानवांनो या रे या
आज्ञान सोडून विज्ञान घ्या
मानवतेचा धर्म तुमचा
उच्च बिंदुवर घेऊन जा !!

उठा आत्ता तरी जागा
समतेचा झेंडा घेऊ कामाला लागा
अंधारलेल्या मना मना ला
उजेडाचा मार्ग सांगा !!

दैववादी ते नामर्द
शंभूराजेंचे बोल घ्या
प्रयत्नवादाची साद ऐकून
विज्ञानाची ज्योत घ्या

मानवतेच्या तत्वांसाठी
आज्ञानाला मात द्या
विज्ञानाची कास धरून
उच्च बिंदूवर रूढ व्हा !!

तुकोबांची अभंगवाणी
आज्ञानाचे करते पाणी
मानवतेचा धर्म बांधण्यासाठी
टाळावी जिवीतांची हानी !!

✒विराट शिंदे
मो-9673797996

© कवीतेत कोणाचेही नाव टाकू नये... हि वीनंती...

Marathi Kavita : मराठी कविता