Author Topic: नवदुर्गा  (Read 591 times)

Offline smadye

  • Newbie
  • *
  • Posts: 41
नवदुर्गा
« on: October 13, 2015, 10:28:02 PM »
  नवदुर्गा

आई आंबे तू कृपाळू माउली
भक्तास्तव संकटसमयी धावणारी प्रेमळ साउली
नवदुर्गा तू नवरुपात तुझा अवतार
तुझे नाम घेता आम्हास वाटे मोठा आधार

आई तू शैलपुत्री , ब्रम्हचारिणी
तूची चंद्रघंटा आणि कुश्मांडा
सिंहासनी आरुढली तू स्कंदमाता कान्त्यायनी
तूची कालरात्री, महागौरी सिद्धीदात्री

नवरुपात अवतरुनी दाविलेस अनंत गुण
पामर आम्ही समजू न शकू तुझे महिमान
शक्तीची तुझी रूपे विसरुनी नवीनच काय हे चालले
नवरूपे विसरुनी नऊ रंगाचे वेश आम्ही घातले

कळला का अर्थ या नवरात्रीचा कोणाला
तुझ्या शक्ती आणि गुणांचे महिमान कधी कळेल आम्हाला
नवरुपात अवतरूनि तू बोध आम्हासी केलास
तो बोध अंगी मुरवण्यास हे माते शक्ती दे आम्हास

                  सौ सुप्रिया समीर मडये
                 madyesupriya@gmail.com

     
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ajaydhikale11

  • Newbie
  • *
  • Posts: 7
Re: नवदुर्गा
« Reply #1 on: October 14, 2015, 10:11:56 AM »

  नवदुर्गा

आई आंबे तू कृपाळू माउली
भक्तास्तव संकटसमयी धावणारी प्रेमळ साउली
नवदुर्गा तू नवरुपात तुझा अवतार
तुझे नाम घेता आम्हास वाटे मोठा आधार

आई तू शैलपुत्री , ब्रम्हचारिणी
तूची चंद्रघंटा आणि कुश्मांडा
सिंहासनी आरुढली तू स्कंदमाता कान्त्यायनी
तूची कालरात्री, महागौरी सिद्धीदात्री

नवरुपात अवतरुनी दाविलेस अनंत गुण
पामर आम्ही समजू न शकू तुझे महिमान
शक्तीची तुझी रूपे विसरुनी नवीनच काय हे चालले
नवरूपे विसरुनी नऊ रंगाचे वेश आम्ही घातले

कळला का अर्थ या नवरात्रीचा कोणाला
तुझ्या शक्ती आणि गुणांचे महिमान कधी कळेल आम्हाला
नवरुपात अवतरूनि तू बोध आम्हासी केलास
तो बोध अंगी मुरवण्यास हे माते शक्ती दे आम्हास

                  सौ सुप्रिया समीर मडये