Author Topic: रावण मनातला..  (Read 734 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
रावण मनातला..
« on: October 22, 2015, 09:48:21 PM »
रावण मनातला

धडधडत जळतोय रावण
उंच आकाशात त्याच्या ज्वाला
डोकावून पाहा ह्रदयात
रावण आपल्यात किती विसावला

पाडाव केला रावणाचा
त्या रणधुरंदर रामाच्या बाणाने
समजतो स्वतःला राम
रावणच आहोत आपण मनाने

असंख्य वाईट कृत्ये
आपल्याच हाताने करतो रोज
धडधडत जळतोय रावण
सोबत जाळा दुर्विचार आज

            ~ प्रविण.
----×----×----
प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007
Www.facebook.com/kalepravinr
http://pravinkalemy.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ravi Padekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 146
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: रावण मनातला..
« Reply #1 on: October 30, 2015, 03:19:10 PM »
khup chhan...