Author Topic: भीम माझा सांगा कुणामध्ये दिसतो  (Read 491 times)

Offline ravindra909

  • Newbie
  • *
  • Posts: 15

चळवळीची दादा गंमत लय भारी
आपलाच माणूस आपल्याशी वाद करी
मानसन्मानाचा इथे मोठा रुबाब असतो
सांगा भीम माझा कुणामध्ये दिसतो ।  धृ ।।
विचारांचे वय आमच्या नाही फार वाढले
थोड्याश्या विचारांनी आम्ही भांडण मात्र काढले
भीम विचारांचे आम्हाला भान नाही राहिले
उपकार बा भीमाचे आम्ही क्षणात कसे विसरले
हेवेदावे आमचे आम्ही करीत बसतो
सांगा भीम माझा कुणामध्ये दिसतो ।। १ ।।
संघटनांचा आमच्या नवा बाजार मांडला
पदांसाठी सार काही इथे विचार जातो मारला
हवा सन्मानांचा वाटा असा कार्यकर्ता निराळा
बाबासाहेबांच्या समता रथाचा बाई गाडा यांनी संभ्रमित केला
समता रथाला नाही नेता आले पुढे तर मागे का सारतो
सांगा भीम माझा कुणामध्ये दिसतो   ।। २।।
समाजाचे भान नाही समाज आजला भीतीने जगतोया
अन्याय अत्याचाराने दादा आजला माणूस मरतोया
नाही कुणी येत तयांना सावराया
प्रसिद्धीचे मोर्चे येती आपली लायकी दाखवाया
मोर्चे निदर्शानातून नुसताच आपलाच टेंभा मिरवतो
सांगा भीम माझा कुणामध्ये दिसतो ।। ३ ।।
भयग्रस्त काळोख्या अंधारात आता वाट पाहतो युगसुर्याची
उजाडेल ती भीम पहाट  एकदा त्या नव चैतन्याची
घालतील हातात हात जेव्हा पाउल पडतील पुढे समता रथाची
मानसन्मान बाजूला ठेवूनलेकरे भीमाची वाट धरतील भिमविचारांची
उना झालेला भीम पुन्हा यांच्या पाहतो
सांगा भीम माझा कुणामध्ये दिसतो  ।। ४


भिमरत्न सावंत[/b]