ओल्या पापण्या
पाणी गालांवरती
जिद्द मनात धरती
ही झेप आकाशाला भिड़ती
कोवळया कळीला
भीती मनाची
सांगणार कोणाला
ती शत्रू स्वताःची
कळी फुलली आनंदानी
चिरडून तिला पयांखालती
फेकून दिले लांब
या तुदावित्य पायांनी
निजल्या डोळ्यांना
भीती मरणाची
तेल ओतून आगीत
भड़का लावण्याची
आग पेट घेती
राख ती करती
असेल शंका कोणाला
स्पर्श होउन जानवती
पाणी घालून आगीत
मिटली ती आग
उरली ती राख
सोडून गेली ती हा डाग
***
...SARIKA