टप टप पडती अंगावरती पाजकाची फुले
भीर भीर भीर भीर तया तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डु ले !
दूर दूर हे सूर वाहती
उनहात पिवाल्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फु ले !
फुलांसारखे सवर फु ला रे
सुरातसूर, मिसलुनी चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !
-
मंगेश पाडगावकर