शोध
त्या उंच कड्यावरती
गर्द हिरवळीतून
आनंदाचे कवडसे दिसले रे
अन मज मी गवसले रे ...
वर सूर्य ओकीसी ज्वाला
तरीही वाही थंड वारा
आज उघडिले श्वासांचे सर्व दरवाजे रे
अन मज मी गवसले रे ...
तू होतास तर होती घुसमट
तू नाहीस तर मिळे मोकळीक
निरपेक्ष मी बाजूला झाले रे
अन मज मी गवसले रे...
नाही आता विचारांची गलबल
नाही कुठला खोटेपणाचा आव
सत्य, प्रखर शब्द आज सुचले रे
अन मज मी गवसले रे ...
आता नाही पलटफेर...
फक्त निश्चायाचेच शब्द सुर
क्षितिजा पल्याड जाईल मजल
अवघे आयुष्यचं बदलले रे
अन मज मी गवसले रे ...
- c @ नेहा घाटपांडे