एका गावात आम्ही दोघ राहत होतो
गोष्ट घडलेली आहे
त्या आधी स्वप्नच पाहत होतो
स्वप्नात एकमेकांच्या खूप जवळ
येत होतो
येता जाता नुसते आणा भाका खात होतो
एका एका नजरेसाठी कासाविस होत होतो
मोठी जातीची भिंत आडवी झाली
दोघांनाही दोन भागात विभागून गेली
तेव्हापासून नजर
त्या रस्त्यावर आहे
जिथे संपेल भिंत तिथेच भेटायचे आहे
पुन्हा एकदा नव स्वप्न पूर्ण करायचे आहे
ती माझी
मी तिचा होउन दाखावयाचेच आहे
कल्पी जोशी १७/१२/2008