अभिजीत सर आमचे, दिसायला भारी छान,
कवितेला सुरुवात करतो, राखून सर्वांचा मान
नावातच त्याच्या दडलंय, आताच जिंकून घे
सर्वाना सांगतात वेळ हीच आहे, थोड तरी शिकून घे
आयुष्यात खूप काही आहे, जो पर्यत आहे सगळ शोधून घे
त्याच्या प्रत्येक यशामागे, आम्हाला सगळ समजत होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
कधीहि नाही केला गर्व आपल्या शिक्षणाचा, नाही केला अन्याय
लॉजिक चा धडा घेवून, सर्वाना दिला एक समान न्याय
पण उगारलं बोट कोणी, तर मग त्याची खैर नाय
त्यांना पाहून प्रत्येकाला वाटेल, काही तरी करायचं होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
कितीही रागावले तरी, त्याचा राग कोणी लावून घेत नाही मनाला
कारण त्याचं बोलणे, आठवत असत प्रत्येक क्षणा क्षणाला
शब्द एवढे आहेत, कि तेच पुरे होतील संपूर्ण जीवनाला
बहुतेक प्रत्येकालाच वाटेल आपल काही तरी चुकत होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
आमचे अभिजीत सर, फार प्रेमळ आहेत
बहुतेक सर्वाच्या मना मनात, तेच घर करून आहेत
कितीही येवू दे अडचणी, ते एकटेच मात करत आहेत
आमच सगळ आयुष्य, त्यांना लागून जायला हवं होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
साई बाबाची कृपा, आमच्या सरांवर आयुष्य भर रहावी
सर्व अडचणीवर मात करण्याची, त्यांना उदंड शक्ती मिळावी
प्रत्येक संधी सुखाची मिळून, त्याची कीर्ती चोफेर गगनात पसरावी
त्याच्या बरोबर राहून, मला संपूर्ण जग जिकल्या सारख वाटत होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
असे आमचे सर, कोणी कितीही मोठे झाले तरी प्रत्येका साठी एक आदर्श असणार
त्याच्या सहवासात राहून सगळेच जण, काही न काही तरी नक्की शिकणार
त्याच्या हृद्यास्पर्श आठवणी, आम्ही आमच्या मनातून कधीच नाही पुसणार
वर्ष संपल तरी त्याच्या सहवासात, अजून मला थोडस राहायचं होत
कितीही मोठा झालो, तरी वाटेल मला अभिजीत सरा सारख व्हायचं होत
मी त्याच्या समोर वयाने व अनुभवाने लहान आहे खूप
तरी माझ्या ह्या कवितेवर करू नका आरोप
हेच सांगून येथून घेतो सर्वाचा निरोप
मला फकत एवढच सागायचं होत, मला काय सगळ्यांनाच वाटेल
कितीही मोठा झालो तरी अभिजीत सरा सारख व्हायचं होत
---विजेंद्र ढगे----
vijendradhage@yahoo.com
हि कविता लोगीकॅल अकादमी, बी केबिन, ठाणे
येथील अभिजीत सरांवर केलेली आहे.