आई माझी अशी, खान अमृताची जशी....
9 महिने 9 दिवस जपले कुशी मद्धे मला
क्षण क्षणा मद्धे ध्यास माझा फक्त तिला
कधी रडली, हसली नाही अश्रू दिले मला
माझ्या रागातही तिने फक्त माया दिली मला
आई माझी अशी जशी कल्परुक्षाची साउली....
जरी भुललो चुकलो साम्भाडले तिने मला
जरी दमलो थकलो विसावा तूच दिला मला
वृक्ष घनदाट केला जोपासून रोपट्याला
वेळो वेळी धावलीस सावरण्या तू ग मला
आई माझी अशी जशी धीराचा डोंगर....
पंख आम्हाला तू दिले पार पहाड करण्या
भर उमेदीचा त्यात माळरान ओलांडण्या
पंख मिळाले ग मला आणि उमेदही तुझ्यामुळे
कृतघ्न होऊनिया दूर गेलो समृद्धीकडे
आई माझी अशी सहन शक्ती धरतीची....
परत येईल घरटी माझ्या परी तुला ठाव
मला भास होतसे जरी चुकलो मी गाव
आता अधीर मी झालो कधी जाणारं परती
कधी परत तू मला मारशील माय-मिठी
कधी परत तू मला मारशील माय-मिठी....
.......दिनेश