जीवनाचा शेवट का सुरवात नव्या जीवनाची
चंद्र रात्रीचा का रात्र चांदण्यांची
सोंगट्या मांडून खेळ मोडावा
अशी गात का मग झाली
डगमगलेल्या जीवनाला ताकद सावरण्याची
निवांत मन धाव घेई
हि वृत्ती आत्महत्येची
शिम्पलीतला मोती शोधावा
का दगडाला लाथ मारून होऊ जखमी
हवेत विरघळणाऱ्या कापराची जागा झालो मी
का सुगंध दरवळणाऱ्या अत्तराचा गंध झालो मी
मुठीत जीव केवढा म्हणून मुठ सोडून दिली
पाच बोटांनी एक करून
हि मुठ पुन्हा आवळून धरली
काजळात रंग काळा लपला
नजर लागू नये म्हणून गालावर चेपला
कमी माझ्यात दडली नव्हती
मी तिला दडवली होती
पंगळ्याला पाय नाही
धैर्य जीवन जगण्याची
शाई पेनाची ओरखाडत
कोऱ्या पानावर अर्थ ओतण्याची.
चाळून उरलेला गाळ कामाचा काय
म्हणून फेकून दिला.
तोच हुडकून चिमुकल्याने
कसा खाल्ला?
कोमेजलेली फुले अंगणात पडली
केर झाला म्हणून दूर नेऊन टाकली
का मग विचार झाला
सर्व आहे माझ्याकडे
मग आत्महत्या का करायची?
.....SARIKA BANSODE