Author Topic: नव बळ  (Read 1655 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
नव बळ
« on: February 15, 2009, 07:18:24 PM »
नेहमी प्रमाणे त्याची रस्त्यात भेट घडली
भेट घडली म्हणण्यापेक्षा त्याने मला हाक मारली
टाळणे शक्यच नव्हते म्हणून मी ही त्याच्याकडे नजर टाकली
त्याच्या त्या रापलेल्या चेहरयाची आणि
पानवलेल्या डोळ्याची मनाला कीव वाटली
शांतपणे स्वताशीच बोलावे तसा तो बडबडला
काय सांगू सर जिंदगी तर थांबली आहे
केलेली एक चुक पुन्हा पुन्हा नडली आहे
दारू सोडली दारू सोडली सांगून कोणाला पटत नाही
किती ही चांगले वागू दे जुने कोणी विसरत नाही
पाठीवरुन त्याच्या जेव्हा हात मी फिरवला
खरच त्याचा प्रमाणिकपणा पुन्हा पुन्हा जाणवला
स्वाताचीच लाज वाटली खरच का आपण आसे वागत होतो
खूप शिक्षा भोगली होती त्याने मग का तीच चुक उगाचच तानात होतो
तेवढ्यात तो पुन्हा बडबडला " हारणार नाही सर मी
आता पूर्वीच्या चुकांची भरपाई करणार मी
ठरवलय दुरवलेल्या सर्वाना आपल बनवणार मी
कोणी कसे ही वागले तरी ह्या असच जगणार मी
तुम्ही भेटलात दोन शब्द बोललात मन हलक हलक झाल
तुमचा हात पाठीवर आहे जगायचे नव बळ मिळाल
===========================================
सुगंध

Marathi Kavita : मराठी कविता


Offline deepakthakare

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: नव बळ
« Reply #1 on: September 06, 2010, 11:33:02 AM »
Khup chan kavita ahe .