फूलं
आणि थडगे
थडगे-
ढाली तुजवरी प्रशांत समयी जे अश्रू जोतीष्मती
त्याचे तू करितेस काय कुसूमा? सांगे मला सत्वरी
फूल
मित्र सांग! तुझ्याही कुक्षी कुहरी जे जीव संवेषति
त्यांचे तू करितेस काय न काळे अद्याप माते तरी
अश्रुंचे रमणीय अत्तर नवे मी निर्मिते कौश्यले
त्याने नादावतो प्रभात समयी सर्वत्र गुंजा ध्वनी !
थडगे
माझ्या उदरामध्ये आजवरी जे जीव बा पातले
त्यांचे मी करी देवदूत, सकला हि गोष्ट आहे जुनी
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर