काळोखात किर्र रात्रीच्या
जगला जो आशेने
धरुनी हात उठवले
त्यास नव्या उषेने
दुभंगली धरणी माता
जानकी मग प्रगटली
सोसुनी कष्टे हजारो
प्रेरणा जगा दावली
स्तंभ फाडूनी पहाडी
देवा जगती यावे लागले
भक्ती ज्योत ठेवण्या तेवती
प्राण, श्रावणाचे वाचले
पांडूपुत्रांनी कशाला
अज्ञातवास तो भोगला
नियतीचा तो खेळ सारा
सर्वत्र स्थापण्या धर्माला
सर्वस्वाचा त्याग करून
ज्ञान-गंगा जागी वाहली
बाल नरेंद्र नटखट तो
स्वामी म्हणून तव लाभला
स्वबळाला जागओनी
कर्मयोग जगण्या भिन्नवावे
पार करण्या अडचण्णींना
आत्म विश्वासा मनी जागवावे
..... दिनेश...