अजूनही माग घेते मी एकविसाव्या शतकाचा
उकल पडेना स्त्रीच्या जीवन गाथेचा
क्रांतिकारी ती स्त्री एक गेली अवकाशात
अशी हि का एक स्त्री असे मग नरक यातनात
क्रांतिकारी त्या स्त्रीने केले अवगत तंत्र ज्ञान
अशी हि का एक स्त्री असे ठाऊक ना तिज ज्ञान
क्रांतिकारी ती स्त्री गेली पुरुषा ओलांडून
अशी हि का एक स्त्री असे चूल मुल सांभाळून
क्रांतिकारी ती स्त्री मांडते मत अपुले जगतात
शालीन कुलीन मग स्त्री का राहते उपेक्षित
बदलले जरी जग झाली वस्ती चांद्रभूमी
राहील तरीही स्त्रीची घर हीच युद्ध भूमी
घर हीच युद्ध भूमी ...
कविता बोडस