"आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
असली जरी वाट कठीण चालतच जायचं असतं
आयुष्यात मात्र कधी मागे सरायचं नसतं
असेल विश्वास आपल्यांवर जरी
परक्यांवर ठेवायला कधी कातरायचा नसतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचं असतं
नवीन काही तरी शोधताना जुन्यांना मात्र कधी विसरायचं नसतं
पण जुन्यांच्या साथीत राहून नव्यांना कधी डावलायच नसतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं
आयुष्यातल्या कटू आठवणी आणि सुखी क्षण वाटण्यासाठी
कुणीतरी असावं लागत असतं
म्हणूनच देवाने बनवली आहे मैत्री या जगात
खरया मित्रांचं ते कर्तव्य असतं पण
खोट्याना ते जमेलच असं नसतं
म्हणूनच आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं..
आयुष्य असते एक लढाई
ती प्रत्येकालाच जिंकावास वाटत असतं
हरलो जरी त्यात कधी खचायचा नसतं
पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकायचं असतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
आयुष्यात जरी हरलो तरी साथ घ्यायची जिंकनार्याची
कारण तो सुद्धा हारल्यानंतरच जिंकायला शिकलेला असतो
अनुभवाच्या बोलातून त्याच्या सगळं काही शिकायचा असतं
आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं
नेहमी नवीन काहीतरी शोधायचं असतं
आयुष्यात जे जे काही घडतं ते सगळं पहिल्यांदाच आणि नवीनच घडत असतं
पण घडून गेल्यावर मात्र ते कधी विसरायचा नसतं
त्यातूनच घेऊन बोध चांगल्या वाईट गोष्टींचा
आयुष्य सुंदर बनवायचं असतं
म्हणूनच म्हणतो आयुष्यात कधी मागे सरायचं नसतं.....
नेहमी नवीन काही तरी शोधायचा असतं...."
परेश गुंदेचा.
(हि माझ्या आयुष्यातली पहिली कविता आहे.तुम्हाला आवडेल कि नाही ते माहित नाही.पण काही चुका असल्यास नक्की कळवा.)