ध्येय निश्चित झालं,
की वाट आपोआप सापडते....
न करण्याला हजार कारणं देण्याऎवजी
करण्यासाठी एकच कारण पुरेसं ठरते....
सुरुवात कुठून तरी करायाची असते,
छोटी किवा मोठी पहायची नसते...
ध्येयावरच प्रेम करत,
वादळ प्यायचं असतं....
यशच्या फळासाठी
अपयशाचे विष पचवण्याची सवय करावी लागते....
यश लगेच नसते मिळत ,
त्यासाठी मेहनत घ्यावीच लागते...
हरली मेच एकदा ,
म्हणून खेळणे सोडायचे नसते....
एकदा नकार आला ,
म्हणून रडायचे नसते....
ज्याने नाकारले,
त्यालाही उद्या लाज वाटेल,
असे स्वताला घडवायचे असते....
अडथळे येतील रोजच मित्रांनो ,
म्हणून चालणे सोडायचे नसते....
साच्यात ठेवून स्वताला ,
कुणी मुक्त आकाश गाठू शकल नसत....
आज उन आहे म्हणून काय झाले ,
उद्या तुज्याच यशाचा पावूस नक्की पडेल....
अपयश आल्या खेरीज,
यश येत नाही....
ट्युशन वर प्रेम करण्यापेक्षा ,
पुस्तकांना मित्र कर....
अपयश येईल ,
आणि उद्याच्या यशाचा टेलीग्राम देवून जाईल.....
- गिरिष देशमुख