मी आधिच माझ्या दुःखाला कवटाळून आहे
आपल्यांचे वार सारे काळजावर पाळून आहे
जे खास होते घास भरवंतांना माझ्या सोबती
त्यांना ही शक्यतो आता जरासा टाळून आहे
कधी वाटलेच नव्हते कविता ही पाठ फिरवेल
तिची इच्छा नसतांना शब्द गळ्यात माळून आहे
कोणी ही सरणावर माझ्या थोडे सुख देऊन जा
सोबत जो घात झालेला जातांना सांभाळून आहे
माहीत आहे देहाला कोणती जात नसते मेल्यावर
तरी गड्या जातांना माणुसकी जात कुरवाळून आहे
कविराज.........अमोल
मो...९६३७०४०९००.अहमदनगर