दिपोस्तवातील दिवस शेवटचा
भाऊ बहीणीच्या भाऊबीजेचा
भाऊ बहीणीच्या नात्यातील
वीण अधीक घट्ट करणारा
बहीण भावाच्या अतुट मायेचा
निखळ निस्सीम प्रेमाच्या छायेचा
सण हा भाऊबीजेचा
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा
बहीणीच्या रक्षणाच्या वचनाचा
भावाच्या प्रेमाच्या बंधनाचा
दोघांच्या अतुट मायेचा
सण हा आज भाऊबीजेचा
नाते हे बहीण भावाचे
प्रेमाचे अनं विश्वासाचे
भाऊबीजेच्या औक्षणाने
आयुष्यभर अतुट राहते
उमेश.......