नव्हता मूळात हा व्यापार कुणाचा
तेच बोलले केला विस्तार कुणाचा
हलकट दुनियेच ऐकून वागलो मी
दुरून बोलती केला शृंगार कुणाचा
कपटी वागलो मी नात्यात आपल्या
कळले नंतर तूटला संसार कुणाचा
चूक झाली विश्वास ठेवून जगावर
या दुःखी रस्त्यावर विचार कुणाचा
जगावे म्हणतो आहे पुन्हा नव्याने
मुखी घेणार नाही उच्चार कुणाचा
माफ करा हो शेवटची देऊन संधी
नाही मला शेवटी आधार कुणाचा
कविराज....अमोल.....
मो.७८२८८९५५५५...अहमदनगर