🚩फिरंगोजी नरसाळे 🚩
छप्पन इंचाची छाती घेउनी गनिमांशी झुंजला
त्रेपन दिवस संग्राम करुनी तरी फिरंगोजी न थकला
राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले
संधी साधुन शाहिस्तेखानाने लाल महालात तळ ठोकले
कितीतरी दिवस वणवण करुनी साधा एक किल्ला त्याने ने घ्यावा
आणि स्वतःला औरंगजेबाचा मामा समजाव
कोणता करावा कावा
कसा नेम साधावा
किल्ला कोणता घ्यावा
असा मोठा पेच पडावा
आणि त्यात संग्रामगड त्याच्या दृष्टीस पडावा
माहिती काढली त्याने किल्ल्यावर शे पाचशे मावळ्यांची शिबंदी
वीस हजारांची फौज घेऊनी काही तासांत देऊ त्यांना तोफेच्या तोंडी
राखण्यासाठी चाकणची गडी
तयार झाला एक एक मराठा गडी
किल्याच्या आवारात बांधणार साऱ्यांची मढी
जीव गेला तरी बेहत्तर गनीम शिरू देणार नाही किल्यामधी
शाहिस्तेखान त्याच समयाला याला संग्रामदुर्गाला
फिरंगोजी वरून पाहतो वीस हजार फौजेला
आणि फिरून आपल्या मावळ्यांना उद्देशाला
जागा आता स्वराज्य शापथेला
गनिम आला आहे दरवाज्याला
तलवार घ्या संगतीला
सज्ज व्हा आता युद्धाला
बाणाच्या माऱ्यात शत्रु येता
एक एक अचुक टिपत
पहिली फळी अख्खी गेली गारद
बंदुकीच्या फैरी झाडून दुसरीची ही केली सारखीच गत
बिचारे मुघल दिवसा खान झोपु देत नाही
आणि रात्रीला मराठ्यांच्या भीतीने झोप लागत नाही
रात्र जशी चढायची मराठ्यांची टोळधाड मुघल छावणी वर धडकायची
हिरवी मुघली पीक ती उध्वस्त करून टाकायची
दहशत इतकी मजली अनेक सैनिक रात्री छावणी सोडून राहू लागले
दिवसा मात्र ते आपली बढया मारण्यास ना थकले
खेळ सारा बुद्धीचा
राजा जरी शाहिस्तेखान असला तरी किल्यावर फिरंगोजी वजीर बसला
एक एक पाऊल खान जसा वर चढत
वजीराचा हल्ला तेवढा तिखट बसत
मुक्त तो वजीर करत होता चौफेर प्रहार
पटावरील मुघली प्याद्यांचा करत होता संहार
एक डाव खानान साधला
बुरुजाखाली सुरुंग त्याने पेरला
वात देता बुरुज उडून गेला आभाळा
पन्नास साठ मावळा त्याबरोबर वर फेकला
स्वराज्यासाठी हसत हसत त्यांनी प्राण त्यागला
किल्ल्याला पडले होते खिंडार
एक एक मुघल किल्ल्यात झाला दाखल
मराठे मुघल आले समोर
एकास वीस अशी झाली लढत
शेवटी मराठे मुघलांवर सरस ठरत
पिछेहाट झाली मुघलांची
सवय झाली होती त्यांना हरण्याची
असे किती दिवस चालणार होते
मराठे ही किती दिवस भुईकोट झुंझवणार होते
इतक्यात मुघल छावणीत सफेद ध्वज फडकला
तहाचा सांगावा त्यांनी धाडला
किल्ला द्यावा आमच्या ताब्यात वाट करुन देतो तुमच्या माणसांस
राजांचा ही आदेश होता युद्ध जिंकावे गडी राखून
गेलेला गड घेता येईल परी लाखमोलाची माणसे न गमवावी कधी
शब्द आठवूनी राजांचे गड खाली त्वरित झाला
फिरांगोजीला पाहता खान त्याला म्हणाला
आमच्यात येशील तर देऊ मानसन्मान
करू सरदार देऊ अमाप धन
तुझ्या सारखा वीर सैनिक पहिला नाही कधी
मुघल चाकरी कर ये आमच्या मधी
माझ्यासाठी माझा राजा सर्वकाही
राजांसाठी लावतो आम्ही प्राणाची बाजी
तुझी चाकरी ठेव तुझ्यापाशी
स्वराज्यातील भाकरीची किंमत मुघल शाहीत नाही
आऊ साहेबांचा शब्द त्याने राखला
खिन्न मनाने फिरंगोजी राजगडावर दाखल झाला
गडी राखला पण गड सुटला
माफ करावे राजे आम्हाला
फिरंगोजी गडापेक्षा आम्हाला आम्हाला माणस महत्त्वाची
त्यांना गमावून युद्ध आम्हला नाही खेळायची
आणि राहिला प्रश्न शिक्षेचा ती तर गुन्हेगाराला द्यायची असते
तुमच्या सारख्या लोकांना मानाचं कड द्यायचं असतं
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__