Author Topic: आकाशाचे स्वप्न मीही  (Read 1883 times)

Offline kalpij1

  • Newbie
  • *
  • Posts: 13
आकाशाचे स्वप्न मीही
« on: August 15, 2010, 05:24:30 PM »

आकाशाचे स्वप्न मीही
बघत असते आताशा ,
चांदण्याचे हात आले
हाती माझ्या आताशा

ओंजळीतले शिंपले मीही
जपुन ठेवते आताशा
दवभरल्या पाऊलखुणा
कवेत घेते आताशा

गंधभरले भाव वेडे
स्पर्षती मज आताशा
स्वप्नांचे गाव हिरवे
दिसत असते आताशा

रात्रीचे भास काळे
विरुन गेले आताशा
अमावसेच्या त्या सावल्या
विरुन गेल्या आताशा
कल्पी जोशी
१८/०७/२०१०

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: आकाशाचे स्वप्न मीही
« Reply #1 on: August 16, 2010, 09:45:06 AM »
रात्रीचे भास काळे विरुन गेले आताशा
अमावसेच्या त्या सावल्या विरुन गेल्या आताशा

 
chaan aahet hya oli !! mast