Author Topic: वणवण  (Read 1820 times)

Offline प्रशांत

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
वणवण
« on: September 04, 2010, 12:13:20 AM »
रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो,
जन्मभर मी तुला " ये " म्हणत राहिलो !

सांत्वानांना तरी ह्रदय होते कुठे ?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो !

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो !

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो !

ऐनवेळी उभे गाव झाले मुके,
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या,
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज न ताराच तो गवसला नेमका ....
अंबरापार मी वणवणत राहिलो!

-------- सुरेश भट ----------- 

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):