"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Armour"-"चिलखत"
"चिलखत"
-----------
"Armour"
"चिलखत"
-----------
राज्य येईपर्यंत तुमच्यावर मी प्रेम करेन
त्याच उद्देशासाठी तर मी येथे असेन
त्यासाठी माझ्या हृदयास मी सांगेन
भूतकाळातून माझं भविष्य मी घडवेन.
हाती कंदील धरा, मार्ग प्रकशित करा
जीर्ण शीर्ण मार्गाचा अवलंब करा
आपल्या शत्रूंशी मुकाबला करा
आपण दोघेही सैनिकच आहोत, मित्रा.
हाती तलवार घेऊन मी तिथे असेन
घोडदळ तुमच्या आज्ञेनुसार दौडवेन
तुम्ही अग्रेसर व्हा, मी तुमची ढाल बनेन
युद्धभूमीवर मी तुमच्या सोबतच असेन
तुम्हाला काहीही इजा होणार नाही
मी तुमचे चिलखत होणार आहे
फक्त तुमच्यासाठीच, मित्रांनो.
कोणत्याही दगडास नका पलटवू
जळत्या पुलांपासून आपण दूर राहू
जगाची वाहवा आपण सारे घेऊ
आपण सैनिकच आहोत, सारे एकत्र राहू.
हाती तलवार घेऊन मी तिथे असेन
घोडदळ तुमच्या आज्ञेनुसार दौडवेन
तुम्ही अग्रेसर व्हा, मी तुमची ढाल बनेन
युद्धभूमीवर मी तुमच्या सोबतच असेन
तुम्हाला काहीही इजा होणार नाही
मी तुमचे चिलखत होणार आहे
फक्त तुमच्यासाठीच, मित्रांनो.
एकत्र, एकत्र, एकत्र, एकत्र
सारे मिळून, मिळून, मिळून,
एक होऊन, होऊन, होऊन.
हाती तलवार घेऊन मी तिथे असेन
घोडदळ तुमच्या आज्ञेनुसार दौडवेन
तुम्ही अग्रेसर व्हा, मी तुमची ढाल बनेन
युद्धभूमीवर मी तुमच्या सोबतच असेन
तुम्हाला काहीही इजा होणार नाही
मी तुमचे चिलखत होणार आहे
फक्त तुमच्यासाठीच, मित्रांनो.
--a1
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================