"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
-------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Bad Enough"-"अगदीच वाईट"
"अगदीच वाईट"
---------------
"Bad Enough"
"अगदीच वाईट"
----------------
प्रिये, परत ये, माझं ऐक जरा
तुझ्या वागण्याने मी उदासच झालोय पुरा
तुझ्यापर्यंत पोचण्याचा पत्ता सांग मला
तो कट्टाही माझ्यासहच विचाराधीन झाला
काहीतरी आहे जे तुला माहीत आहे
फक्त तुलाच ते ज्ञात आहे.
जरी मी रडलो, तरी ते चांगल्यासाठी असेल
तुझ्यासाठीच माझं हे सारं कर्तव्यच असेल
इथे उभा राहून मला हे सर्व कळत आहे
काहीतरी आहे जे तुला माहीत आहे
फक्त तुलाच ते ज्ञात आहे.
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे.
यातून निघण्यासाठी थोडासा वेळ घे
दुसऱ्याच दृष्टीकोनातून तू पाहून घे
माझं असणं तू विचाराधीन घे
कदाचित, कुठूनतरी मार्ग निघेल
कुठेतरी मग तुला मार्ग मिळेल.
तुझा मार्ग तू शोध, त्या मार्गावरून ये
सर्व सर्व संकटातून तू तरून ये
तुझ्या समस्यांचा विचार आम्ही नक्कीच करू
माहित असलेले तुला आम्ही सर्व सांगू
तू जिथे जाशील, तिथेच आम्ही राहू.
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे.
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरवलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हा भ्रम तू कायमचा काढून टाक
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरवलंय
तू लढा दे, तू लढू शकतेस
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरवलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हा भ्रम तू कायमचा काढून टाक
हे सारं तुझ्या डोक्यातच भरलंय
हे सारं तुझ्या डोक्यातच भरवलंय
तू लढा दे, तू लढू शकतेस
तू नक्कीच लढा देऊन शकतेस.
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
पळून जाणं हा काही अंतिम मार्ग नव्हे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे
सोडून नाही दिलंस तर तुला मिळणार आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे
मला माहितीय तुलाही हे हवं आहे , तुलाही हे हवं आहे
मला माहितीय तुला हे पुरेसं आहे.
--a1
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================