Author Topic: हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो  (Read 118 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 9,386
                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                            --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Be The First To Believe"-"विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो"

                               "विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो"
                              -----------------------------

"Be The First To Believe"
"विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो"
----------------------------

विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो

सर्व-एकापाठोपाठ एक
आम्ही सर्वच ठेवत आलोय, बेबी.

बेन-बेबी, मी माझ्या मनातलं सांगू शकत नाही
ती एखादी संवेदनाच असू शकेल काही.

सर्व-हो तसंच आहे

मार्क-माझ्या मनातलं प्रेम मी मोकळ करतोय
मी तुला अद्भुत प्रदेशात घेऊन जातोय.

सर्व-तू माझी कान उघाडणी करून गेलीस
ऐकलं नाही आईच, ती सांगून गेली होती
मला आभाळी तू उंच उडवून गेलीस
ऐकलं नाही आईच, ती सांगून गेली होती.

सर्व-मुली, हा स्वर्ग आमचा आहे
ही पृथ्वी, हा चंद्र आणि तारा आमचा आहे
विश्वास ठेव आमच्यावर, बेबी.

मार्क-तुला विश्वास ठेवावाच लागेल

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

बेन-विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो

क्रिस्टिअन-आपल्या प्रेमाला उंच आभाळी घेऊन जा
थंड वाऱ्याच्या कंपनांत त्याला ठेवून जा.

सर्व-आम्हालाही घेऊन जा

पॉल-तुझ्या डोळ्यांनीच मला स्वर्गात उडवून ने
ही तुझ्या संमोहनाची जादू मला दाखवून दे.

सर्व-होय, आम्हालाही दाखवून दे
तू आम्हाला खरं काय ते दाखवून दे.

सर्व-मुली, हा स्वर्ग आमचा आहे
ही पृथ्वी, हा चंद्र आणि तारा आमचा आहे
विश्वास ठेव आमच्यावर, बेबी.

पॉल-तुला विश्वास ठेवावाच लागेल

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

क्रिस्टिअन-विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

मार्क-तुला विश्वास ठेवावाच लागेल

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

बेन-सांगितलं ना, विश्वास ठेवणारी तू पहिलीच हो

सर्व-एकापाठोपाठ एक
आम्ही सर्वच ठेवत आलोय, बेबी
एकापाठोपाठ एक
आम्ही सर्वच ठेवत आलोय.

सर्व-मुली, हा स्वर्ग आमचा आहे
ही पृथ्वी, हा चंद्र आणि तारा आमचा आहे
विश्वास ठेव आमच्यावर, बेबी
एकापाठोपाठ एक.

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

एकापाठोपाठ एक
एकामागोमाग एक.

सर्व-विश्वास ठेव आमच्यावर, बेबी

--a1
------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
                   ------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):