"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Blackout"-"ब्लॅक आऊट-अंधार करणे"
"ब्लॅक आऊट-अंधार करणे"
-------------------------
"Blackout"
"ब्लॅक आऊट-अंधार करणे"
-------------------------
तुझे डोळे मला काही सांगत होते
तुझे नयन काही बोलत होते
अफवा ऐकत होतो, तुझ्या एकलेपणाची
स्वतःच्या पायावर उभे राहण्याची.
या गोष्टीवर मी विचार करू लागलो
या गोष्टीने मी कासावीस होऊ लागलो
माहित होत, की तुला प्रेम हवंय
की नुसतंच मित्रत्त्वाचं नातं हवंय.
घाबरू नकोस, आपण हे कुणाला नाही सांगणार
चिंता करू नकोस, आपलं गुपित हे गुपितच राहणार
कोणताच धागा नाही, त्याच एकमेकात गुंतणं नाही
फक्त हा शेवटपर्यंत आपला जय-विजयच राही.
थांबू नकोस, प्रतिकारही करू नकोस
कारण आपले सह-अस्तीत्व टिकेल भरघोस
आणि जेव्हा दिवे जातील, अंधार होईल
थोडासा धोका पत्कर, हेही दूर होईल
आणि माझी अंधाराची तू एक मैत्रीण हो
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल.
आपण दोघेही मग वेगळे होऊया, वेगळे जाऊया
फक्त एवढं माहित असुदे , परत घरीही येऊया
पुन्हा आपण दोघे एकत्र येऊया, एकत्र राहूया
आपल्या मनाला आपल्याला फसवायचं नाही
आपल्याला दुखापतही करून घ्यायची नाही
तसा विचार करण्याची आपल्याला गरजही नाही.
घाबरू नकोस, आपण हे कुणाला नाही सांगणार
चिंता करू नकोस, आपलं गुपित हे गुपितच राहणार
कोणताच धागा नाही, त्याच एकमेकात गुंतणं नाही
फक्त हा शेवटपर्यंत आपला जय-विजयच राही.
थांबू नकोस, प्रतिकारही करू नकोस
कारण आपले सह-अस्तीत्व टिकेल भरघोस
आणि जेव्हा दिवे जातील, अंधार होईल
थोडासा धोका पत्कर, हेही दूर होईल
आणि माझी अंधाराची तू एक मैत्रीण हो
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल.
बाहेर जा, बाहेर निघून जा
थांबू नकोस, प्रतिकारही करू नकोस
कारण आपले सह-अस्तीत्व टिकेल भरघोस
आणि जेव्हा दिवे जातील, अंधार होईल
थोडासा धोका पत्कर, हेही दूर होईल
आणि माझी अंधाराची तू एक मैत्रीण हो
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल
जेव्हा दिवे जातील, जेव्हा अंधार होईल.
--a1
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================