"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
-------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Celebrate Our Love"-"आपलं प्रेम साजरं करूया"
"आपलं प्रेम साजरं करूया"
-------------------------
"Celebrate Our Love"
"आपलं प्रेम साजरं करूया"
------------------------
स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या मनाचं ऐक
लोकांचं ऐकू नकोस, मनातून काढून टाक, फेक
तुला वरचं घेऊन जाईल, तुझा हा विश्वास नेक.
माझं ऐकून घे जरा
तुझं भय तू टाकून दे, कर जरा त्वरा
आपण दोघे मिळून करू हे, भराभरा
बेबी, तुझ्या भीतीचा करून टाक निचरा.
जगालाही हलवून टाकणारे आवाज तुम्ही ऐका
आकाशालाही भेदून टाकणारी शाश्वतता तुम्ही नजरेने शोधा.
सर्वानी त्वरा करा, तिथे समारंभ आयोजित केलाय
तिथला प्रत्येकजण तुमच्यासाठी थांबलाय
तुम्ही संधीचे सोने करताय, तुम्ही बदल घडवताय
तुम्ही काहीतरी नवीनतेची सुरुवात करताय.
कोरस-
जगातील प्रत्येकजण गाणे गातोय
सुरुवातीपासून तो सुरुवात करतोय
प्रत्येकजण अशी कल्पनाच करतोय
आमचं प्रेम साजरं करा
ठिकठिकाणी उत्सव मनवला जातोय
अहो, आमचं प्रेम साजरं करा.
स्वतंत्रता आम्हाला हवी आहे
नियती घडवणं आमच्या हाती आहे
चांगलं, उदात्त हे चिरकाल टिकणार आहे
ते कधीच थांबणार नाही.
आम्हाला आता निघायला हवं
आम्हाला आमचं कर्तव्य पूर्ण करायला हवं
आजची रात्र आमची आहे, आमची आजच सुरुवात होणार आहे
आम्ही तुला समजावूच, थोडं समजून घे ना, बेबी.
कोरस-
होय, होय, होय, होय,
ना ना ना ना ना
होय, होय, होय, होय,
आपलं प्रेम साजरं करूया.
आता सुरांना नियंत्रण घेऊ दे
तुझ्या आत्मा अग्निसम तप्त होऊ दे
तुझ्या डोळ्यांत एक जादू आहे
रात्रभर हे संगीत वाजत राहू दे.
आता सुरांना नियंत्रण घेऊ दे
तुझ्या आत्मा अग्निसम तप्त होऊ दे
तुझ्या डोळ्यांत एक जादू आहे
रात्रभर हे संगीत वाजत राहू दे.
--a1
-----
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================