"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
-------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Christopher Columbus"-"ख्रिस्तोफर कोलंबस"
"ख्रिस्तोफर कोलंबस"
-------------------
"Christopher Columbus"
"ख्रिस्तोफर कोलंबस"
---------------------------
माझ्याबरोबर तू चालत होतीस
तू लाईनीत उभी होतीस, पण काहीच बोलत नव्हतीस
मला तुला काही होतं सांगायचं
पण मला तेच जाचत होतं कसं बोलायचं
माझा कंपास (दिशा सूचक यंत्र), नकळत मी तुला दिल होतं
तू माझी ख्रिस्तोफर कोलंबस होशील का ?
माझं जग तू शोधशील का ?
माझ्या जगाच तू अन्वेषण करशील का ?
हे मला तुला आताच सांगायचंय
माझ्या मनात मला हे नाही ठेवायचंय
मी तुला हे सांगण्यास उतावीळच झालोय.
आणि हे पहा, हेच ते सत्य आहे
मी तुझाच आहे, हेच ते सत्य आहे
पण मला वाटत नाही मी तोच आहे
ज्याच्या तू कळकळीने शोधात आहे
पण ठाऊक कुणाला भविष्यात काय घडणार आहे ?
ये बेबी, फक्त एक संधी घे तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू.
अंती मी शोधतं असलेले गुपित बाहेर पडलेच
आणि माझं हृदय मोकळं होताच मला असुरक्षित वाटलेच
पण तुझ्याकडून उत्तर मिळत नव्हतं
मी अजूनही इथेच आहे
मी अजूनही वाट पाहत आहे
तुझी नौका मला दिसेपर्यंत मी वाट पाहत आहे
तू माझी कधी होणार आहेस ?
आता मला तुला काही दाखवायचंय
माझ्या मनात मला हे नाही ठेवायचंय
मी तुला हे सांगण्यास उतावीळच झालोय.
आणि हे पहा, हेच ते सत्य आहे
मी तुझाच आहे, हेच ते सत्य आहे
पण मला वाटत नाही मी तोच आहे
ज्याच्या तू कळकळीने शोधात आहे
पण ठाऊक कुणाला भविष्यात काय घडणार आहे ?
ये बेबी, फक्त एक संधी घे तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू.
आणि मला आता उशिरच झालाय
तुझा शोध केव्हाच लागून गेलाय
इच्छा होती माझी, मी जर ख्रिस्तोफर कोलंबस असतो
आणि तुला प्रथमच शोधतं असतो.
आणि हे पहा, हेच ते सत्य आहे
मी तुझाच आहे, हेच ते सत्य आहे
पण मला वाटत नाही मी तोच आहे
ज्याच्या तू कळकळीने शोधात आहे
पण ठाऊक कुणाला भविष्यात काय घडणार आहे ?
ये बेबी, फक्त एक संधी घे तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू
ये बेबी, फक्त एक संधी घे तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू
ये बेबी, फक्त एक संधी घे तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू
ये बेबी, माझं दार ठोठाव तू.
--a1
-----
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2023-बुधवार.
=========================================