"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"A", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "Owner Of A Lonely Heart"- "एकाकी हृदयाचा मालक"
"एकाकी हृदयाचा मालक"
------------------------
"Owner Of A Lonely Heart"
"एकाकी हृदयाचा मालक"
-------------------------------
स्वतःला हलवा तुम्ही, येथून निघून जा
तुम्ही तुमचं आयुष्य जगलात पहा
सिद्ध करा तुम्ही येथून निघून गेलात, इथून हललात
जिंकण्याची वा हरण्याची एक संधी घ्या.
स्वतःला पहा, तुम्ही तुमची पायरी ओलांडताना
तुम्ही स्वतःच आहात, तुमचा हाच एक रस्ता होता ना
इथून हलताना, निघून जाताना तुमची थरथर होऊ दे
आणि ही गोष्ट पुढे कायम राहू दे.
एकाकी हृदयाचा मालक
हे खूपच चांगलं असत
तुटलेल्या हृदयाच्या मालकIपेक्षा
एकाकी हृदयाचा मालक.
तर तुम्हाला ती संधी नाही घ्यायचीय
तुम्हाला झालेली यापूर्वीची दुखापत कुरवाळायचीय
पहा, तो आकाशात उडणारा गरुड पक्षी पहा
त्याचे उडणे पहा, त्याची ती गरुड भरारी पहा.
तुम्ही आपणहूनच हरताय, तुम्ही स्वतःलाच हरवताय
यापेक्षा दुःखाची गोष्ट आणि तुम्ही काय करताय ?
एकटं राहणं हा उपाय नाही, हेच कारण तुम्ही स्वीकारताय.
तुम्ही स्वतः स्वतःचे व्हा, तुम्ही स्वतःला घडवा
तुमच्या मुक्त इच्छाशक्तीला एक संधी द्या
यशाचे मानकरी व्हा, यश मिळावा, यशस्वी व्हा.
एकाकी हृदयाचा मालक
एकाकी हृदयाचा मालक
हे खूपच चांगलं असत
तुटलेल्या हृदयाच्या मालकIपेक्षा
एकाकी हृदयाचा मालक
एकाकी हृदयाचा मालक.
माझ्या स्वतःचा निर्णय असा होत नव्हता
त्यांनी माझ्या मनाचा गोंधळच उडवला होता
माझ्या प्रेमाने काहीच प्रश्न केला नव्हता
तुमच्या इच्छेचा आदरच केला होता
सरतेशेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे
उडी मारण्यापुवी मनाचंI निर्धार करायचा आहे.
एकाकी हृदयाचा मालक
एकाकी हृदयाचा मालक
हे खूपच चांगलं असत
तुटलेल्या हृदयाच्या मालकIपेक्षा
एकाकी हृदयाचा मालक.
आता नाहीतर नंतर, ते ठरेलच
एकाकी हृदयच त्याचा अंतिम निर्णय घेईलच
होय, ते नक्की घेईलच
ते उत्साहित होईल, ते आनंदित होईल
आणि एक नवीन सुरुवात करीलच.
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका.
फक्त ते मिळवा, ते प्राप्त करा
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका
तुम्ही तुमच्या मुक्त इच्छेविरुद्ध जाऊ नका
तुम्ही तुमच्या स्वतःलाच फसवू नका
फक्त ते मिळवा, ते प्राप्त करा.
--A
-----
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-सॉंग लैरिकस.कॉम)
-------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.03.2023-सोमवार.
=========================================