सुटेल कधी हे कळत नाही
महागाईचा हा विळखा
धान्य सडले तरी चालेल
पण गरिबांना ते देवू नका
कंबर मोडली महागाईने
तरी नाही सरकारला चिंता
चटके सोसतच राहिली
महागाईत होरपळली ही जनता
गरिबांच्या जगण्याला अर्थ नाही
हास्य गेले सारे विसरून
काय खावे या महागाई मध्ये
खातो चटणी भाकरीत अश्रू मिसळून
होते कधीकाळी सुखाचे दिवस
आज अश्रूंचा सागर वाहतो
महागाईचा हा भस्मासूर
जनतेचा तमाशा हसून पाहतो
कधी संपेल हा खेळ सारा
कसे झाले हे अवस्थांतर
होईल महागाई एकदाची कमी
कदाचीत गरिबांच्या मरणानंतर