"कलियुग"
या युगात मानवाची, हो झाली मती भ्रष्ट
दे रे हरी खाटेवरी, नकोत त्याला कष्ट
वाममार्गाने मिळविला, हो पैसा त्याने फार
एकेक मंत्री घोटाळ्यात, अडकला दोन चार
धर्माच्या नावाखाली, हो केला हिंसाचार
मौजमस्तीसाठी त्याने केला व्यभिचार
अविचारी झाडे तोडून हो केली जंगले नष्ट
प्रदूषणाचा महिषासुर झाला हो मदमस्त
दारूच्या नशेमध्ये, हो झाला तो उन्मत्त
मानवतेची मुल्ये शोधा झाली कुठे लुप्त
मानवाच्या जर पापांचा हो झाला अतिरेक
विनाशकारी त्रिनेत्राचा होईल रे उद्रेक
-स्वप्नील वायचळ