कविता म्हणजे आपल्या भावनांचे प्रतिरूप असते.
कधी अत्तराची कुपी
कधी वात्सल्याची निशाणी असते.
कधी प्रेमाचा बहर
कधी मैत्रीची लहर असते.
कविता म्हणजे सप्तसुरांची मैफील असते.
कधी सतारीची तान
कधी हलकासा राग असते.
कधी स्वरांची उधळण
कधी सारेगमचा अविष्कार असते.
कविता म्हणजे श्रावणातील हिरवळ असते.
कधी इंद्रधनुचा गोफ
कधी पाचूंची किणकिण असते.
कधी पावसाची सर
कधी बालकवीँची फुलराणी असते.
कविता म्हणजे कल्पसुमनांची सुंदर परडी असते.
कधी रातराणीचा सुगंध
कधी गुलाबाचे काटे असते.
कधी चंद्राची शीतलता
कधी सूर्याची प्रखरता असते.
कविता म्हणजे पहिला पाऊस असते.
कधी मातीचा सुगंध
कधी वेलीँवरील दवबिँदू असते.
कधी वाफाळलेल्या चहाचा कप
कधी कांद्याची गरमागरम भाजी असते.
कविता म्हणजे काँलेजचा कट्टा असते.
कधी मैत्रीची वेल
कधी ध्येयांची चाहूल असते.
कधी कँटिनचा फेरा
कधी गप्पांची मिसळ असते.
कविता म्हणजे,
कविता म्हणजे,
कविताच असते.
थेट जाऊन बोलण्यापेक्षा कविताच बेस्ट असते.